Breaking News

संभाजी महाराजांचे शूरत्व जगावेगळे -वसंत कोळंबे

कर्जत : बातमीदार : छत्रपती संभाजी महाराज यांनी रणांगणात गाजवलेले शूरत्व हे सामान्य सैनिकांसाठी ऊर्जा आणि स्फूर्ती देणारे होते, असे गौरवोद्गाार इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी कर्जतजवळील किरवली येथे काढले. किरवली येथे छत्रपती संभाजी महाराज ग्रुपच्या वतीने नामकरण करण्यात आलेल्या श्री संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. वसंत कोळंबे यांनी या वेळी संभाजी महाराज यांच्या शौर्याची माहिती देताना त्यांच्या जीवनातील अनेक किस्से सांगितले.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे दैवी आशीर्वाद लाभलेल्या संभाजी महाराज यांनी स्वतःची धरपकड झाल्यानंतरदेखील दाखवलेले शूरत्व हे कदापि विसरता येणार नाही, असे सांगून आपल्यातील फितुरीमुळे संभाजी महाराज यांचे आणखी कर्तृत्व जगाला पाहता आले नाही, अशी खंत कोळंबे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने स्थापन केलेल्या ग्रुपची माहिती अध्यक्ष श्रीकांत आगीवले यांनी दिली. कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मराठा स्वराज्य सेवाभावी संस्थेचे कर्जत तालुका अध्यक्ष अनिल भोसले, आगरी समाज संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप माळी, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील रसाळ, सुदर्शन कोळंबे, अशोक मोरे, राजेंद्र जाधव, किरवली शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियांका हरवंदे, भगवान धुळे, उदय चव्हाण, मनोज लाड, दिनेश मिस्त्री यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply