Breaking News

सकारात्मक विचारधारा अंगिकारल्यास यश निश्चित मिळते -नितीन पाटील

कर्जत येथील फार्मसी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

कर्जत : प्रतिनिधी

या युगात संगणक, मोबाइलमुळे आपली विचार करण्याची पद्धती बदलली आहे. आपल्या मेंदूत नकारात्मक विचार पटकन घुसतात. मात्र सकारात्मक विचारधारा अंगिकरल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन ‘उत्तुंग भरारी‘चे नितीन पाटील यांनी येथे केले.

कर्जत येथील कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रथम वर्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेण्यात आली. या सभेत नितीन पाटील मार्गदर्शन करीत होते. स्वतःवर प्रेम करायला शिका म्हणजे पुढे अडचण येणार नाही, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.

प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी फार्मसी क्षेत्रातील विविध संधींविषयी मार्गदर्शन केले. प्रा. गोर्डे यांनी परिक्षापद्दती व गुण कसे दिले जातात याची सविस्तर माहिती दिली. प्रा. प्रीतम जुवाटकर यांनी अभ्यासक्रम, वेळापत्रक आणि दळणवळणाची व्यवस्था कशी असेल हे सांगितले. प्रा. पूनम पाटील यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणार्‍या अन्य उपक्रमांची माहिती दिली.  डॉ. एम. एस. घाडगे, संस्थेचे सचिव प्रदीप श्रुंगारपुरे यांचीही समयोचीत भाषणे झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्वेता गायकवाड यांनी केले. महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय मांडे, पालक प्रतिनिधी नरेश म्हात्रे यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply