Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते काळुंद्रेत आरोग्य शिबिराचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अनेक उपक्रम राबवत आहे. त्यानुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत काळुंद्रे येथे मोफत आरोग्य शिबिर बुधवारी (दि. 23) आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. काळुंद्रे येथील गणपती मंदिरामध्ये झालेल्या या शिबिराला नागरीकांना चांगला प्रतिसाद लाभला. या वेळी नगरसेवक तेजस कांडपीळे, अजय बहिरा, बबन मुकादम, नगरसेविका चारुशीला घरत, राजश्री वावेकर, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्नेहलता म्हात्रे, माजी सदस्य सचिन चिखलेकर, शंकर म्हात्रे, युवा नेते कुणाल म्हात्रे, शक्तीकेंद्र प्रमुख बाळाराम चिखलेकर, श्याम पाटील, डी.एस. घरत, वासुदेव चिखलेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply