पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी पाहणी दौरा सुरू आहे. त्या अंतर्गत त्यांनी शनिवारी (दि. 26) प्रभाग क्रमांक 19 आणि 20मध्ये रस्ते आणि गटारांची पाहणी केली तसेच सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
पनवेल शहरातील पटेल हॉस्पिटल, भाजी मार्केट परिसर, म्हात्रे हॉस्पिटल, तक्का, भिंगारी या परिसरातील रस्ते आणि गटारांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा त्यांनी लोकप्रतिनीधी आणि महापालिकेच्या अधिकार्यांसोबत पाहणी करून आढावा घेतला आणि त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती ड सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, तेजस कांडपिळे, अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रूचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, भाजप नेते अॅड. जितेंद्र वाघमारे, युवा नेते प्रतिक बहिरा, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, वॉर्ड क्रमांक 20 अध्यक्ष रघुनाथ बहिरा, शहर अभियंता संजय कटेकर, उपअभियंता साळुंखे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper