पनवेल : वार्ताहर
पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल पंतजली योग समिती पनवेल व उत्तर भारतीय प्रकोष्ठ यांच्यातर्फे त्यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देवून गौरविण्यात आले. संतोष शेट्टी नगरसेवक असलेले प्रभागातील केलेली विकासकामे तसेच त्यांचा जनतेबद्दल असलेला विश्वास व सातत्याने प्रभागातील समस्या सोडविण्यात ते अग्रेसर असल्याने यंदा त्यांना पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांच्या विभागातील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच वेळोवेळी सामाजिक क्षेत्रात मदत करणार्या संतोष शेट्टी यांचा पंतजली योग समिती पनवेल व उत्तर भारतीय प्रकोष्ठ यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा विशेष सत्कार केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper