Breaking News

‘सरकारमध्ये एक मुख्यमंत्री, अनेक सुपर मुख्यमंत्री’; अनलॉकच्या गोंधळावर फडणवीसांचा निशाणा

नागपूर ः राज्यात अनलॉकसंबंधी झालेल्या गोंधळावरून राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत व बाकीचे सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री असे आहेत जे स्वतःला मुख्यमंत्री समजतात व घोषणा करतात, असा टोला फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 4) प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधने आणू नये, पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचे म्हणणे आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहचले पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी या वेळी केली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply