मुंबई : हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार की मुंबईला यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर अधिवेशनाची तारीख ठरली असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे सलग दुसर्या वर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अधिवेशन नागपूरला घ्यावे की मुंबईला यावरून महाविकास आघाडी सरकारमध्येच मतभेद होते, मात्र आता हे अधिवेशन मुंबईतच होणार आहे. हा निर्णय घेण्यामागे करोनाचे सावट आणि विधान परिषद निवडणूक ही कारणे असल्याचेही बोलले जात आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper