Breaking News

सलग सुट्ट्यांमुळे बोरघाटात वाहनांच्या रांगा

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे त्यानंतर शनिवार व रविवार अशा सलग चार दिवस सुट्ट्या पडल्याने, गुरुवार (दि. 14) सकाळपासून दुपारी चारवाजेपर्यंत  बोरघाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, बोरघाट वाहतूक पोलिसांनी नियोजन करून कोंडी फोडल्याने संध्याकाळी एक्सप्रेस वे व बोरघाटातील वाहतूक सुरळीत झाली.

गुरुवारी सकाळपासूनच खालापूर टोल नाक्यापासून, संपूर्ण बोरघाटात वाहनांची संख्या वाढल्याने, वाहनांच्या रांगा लागल्या व वाहतूक धीम्या गतीने झाली होती. यात दुपारी अंडा पॉईंटपुढे रस्त्यावर एक ट्रक बंद पडल्याने कोंडी अधिक वाढली. दरम्यान, बोरघाट वाहतूक पोलीस, आयआरबी वाहतूक यंत्रणांनी तातडीने ट्रक बाजूला करून रस्ता मोकळा केला. तसेच लेन नियमांच्या कडक पालनासाठी अंमलबजावणी राबविण्यात आल्याने हलक्या वाहनांसाठी एक लेन मोकळी झाल्यावर दुपारी चारनंतर वाहतूक सुरळीत झाली होती.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply