Breaking News

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : प्रतिनिधी

राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पंतप्रधानांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंगशी संवाद साधला.

या कार्यक्रमास लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव, शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा गोसावी, मुलगी उमंग गोसावी, नाईक नंदकुमार चावरे, सुभेदार संजयकुमार मोहिते, एनसीसी अधिकारी बाळासाहेब शिंदे, एनसीसी विद्यार्थी अमंग रुपेली, संकेत कदम, विजयश्री सुरदे, प्रीती जगदाळे आदी उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply