अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे मासिक बजेट कोलमडल्यामुळे राज्यात सहा महिन्यांसाठी मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मालमत्ता कराची भरपाई म्हणून राज्य सरकारने निधी द्यावा, अशी सूचनाही आमदार डावखरे यांनी ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात केली आहे.
भाड्याच्या घरात राहणार्या भाडेकरूंकडून घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलण्याची सूचना राज्य सरकारने घरमालकांना केली. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना सर्व मालमत्तांवर सहा महिने करमाफ करण्याचे आदेश दिल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकेल, अशी मागणीही आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper