पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरात साई डीझाईन स्टुडीओ हे कपड्याचे दुकान नव्याने सुरु झाले आहे. या दुकानाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याहस्ते गुरुवारी (दि. 13) करण्यात आले.पनवेल शहरामध्ये मनोज पटेल आणि संजय पटेल यांनी नव्याने साई डीझाईन स्टुडीओ हे कपड्याचे दुकान सुरु केले आहे. या दुकानामध्ये विविध प्रकारच्या डिझाईन कपड्यांचे कलेक्शन उपलब्ध आहे. या दुकानाचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी या दुकानाचे मालक मनोज पटेल आणि संजय पटेल यांचे अभिनंदन करत दुकानाच्या पुढील वाटचाली करीता सदीच्छा व्यक्त केल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper