Breaking News

साई, बारापाडा पूरग्रस्तांना मदत

भाजप नेते महेश बालदी यांची सामाजिक बांधिलकी

पनवेल : रामप्रहर वृत्त

अतिवृष्टीमुळे घरात पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या साई येथील 45 कुटुंबांना, तर बारापाडा मोहल्ल्यात 47 कुटुंबांना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आर्थिक मदत केली आहे. या पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकीतून घरटी दोन हजार रुपये देण्यात आले.

पनवेल तालुक्यातील साई व बारापाडा गावांत पूरस्थिती निर्माण होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेते महेश बालदी यांनी स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत नुकसानीचा आढावा घेतला आणि पूरबाधित कुटुंबांना घरटी प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मदतीचे वितरण करण्यात आले. मदत देतेवेळी साई येथे सरपंच विद्याधर मोकल व सहकारी तसेच बारापाड्यात अशफाक दाखवे, अखलाख बढे, जीवन टाकळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या मदतीबद्दल ग्रामस्थांनी महेश बालदी यांचे आभार मानले आहेत.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply