साजगाव फाट्यावर एसटी-कारचा अपघात

खोपोली : प्रतिनिधी – खोपोली-पेण रस्त्यावर खोपोलीपासून चार किमी अंतरावर असलेल्या साजगाव फाटा येथे भरधाव कार व एसटी बस यांचा अपघात झाला. मंगळवारी (दि. 29) सकाळी सव्वासहा वाजता ही घटना घडली. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी अथवा जीवित हानी झाली नाही, परंतु कारचे मोठे नुकसान झाले आहे.

गुजरात पासिंगची फॉर्च्युनर कार पेणकडून खोपोलीकडे भरधाव वेगाने येत होती. या वेळी वळण व खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात कार व एसटी बसची धडक झाली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने असल्याने रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी रस्त्यावरील वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply