रसायनी : रामप्रहर वृत्त
सावळे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात रविवारी (दि. 29) सावळे प्राथमिक विद्यालयात दिव्यांग व चाळीस वयोगटावरील नागरिकांसाठी मोफत लसीकरण ठेवण्यात आले होते. या वेळी गावातील दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींना कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात आले. आरोग्य खात्यातचे आधिकारी डॉ. रविराज जाधव, सावळे गावचे सरपंच प्रशांत माळी, ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी, रश्मी गाताडे, प्रगती जांभूळकर, सुरेखा कुरगळे, ग्रामसेवक सतिश देवकाते, लेखनिक हासुराम गायकवाड तसेच सतिश म्हस्कर, ग्रामस्थ प्रभाकर जांभूळकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या सहकार्याने व सावळे ग्रामस्थाच्या उपस्थित ही लसीकरण मोहीम यशस्वी राबविण्यात आली.
RamPrahar – The Panvel Daily Paper