
पनवेल ः रामप्रहर वृत्त
खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात (सिकेटी) मेडिकव्हर हॉस्पिटल, भारतीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांच्या हस्ते झाले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयालाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल, भारतीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राष्ट्रीय सेव योजनेच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर झाले. शिबिरात चष्मे वाटप, नेत्र तपासणी, तसेच विविध तपासण्या करण्यात आल्या. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, आयक्युएसी. समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, वाणिज्य शाखा प्रमुख डॉ. एस. बी. यादव, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी एस. एन. परकाळे, महिला कार्यक्रम अधिकारी अपूर्वा ढगे, कार्यक्रम अधिकारी आकाश पाटील यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper