Breaking News

सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी अश्विन मुग्दल

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार अश्विन मुग्दल यांनी गुरुवारी (दि. 12) सिडकोचे मुख्यालय असलेल्या सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे स्वीकारला. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी अश्विन मुग्दल हे नागपूर येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. सन 2007च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या अश्विन मुग्दल यांनी आपल्या प्रशासकीय सेवेची सुरुवात नाशिक जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली आहे. त्यानंतर पंढरपूर-सोलापूर येथे उपजिल्हा दंडाधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा आणि यवतमाळ येथे जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे अध्यक्ष आणि नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. दरम्यान, अश्विन मुग्दल हे वाणिज्यिक शाखेचे पदवीधर आहेत. सद्यस्थितीत सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्यास आपले प्रथम प्राधान्य असेल, असे अश्विन मुग्दल यांनी सिडकोचा सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारताना सांगितले आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply