Breaking News

सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांचा खारघर शहरात पाहणी दौरा

खारघर : प्रतिनिधी

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 13) खारघर शहराचा पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी शहरातील विविध सेक्टरमध्ये भेट देत त्या ठिकाणची नियोजित कामे, समस्यांची माहिती घेतली आणि त्या मार्गी लावण्याचे निर्देश अधिकारीवर्गाला दिले.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर सेक्टर 2, 8, 10, 3, 4, 11, 5, 4, 2सह रेल्वेस्थानक परिसर, बेलपाडा गाव आदी ठिकाणी भेट देत रस्ते, ड्रेनेज, गटारे यांची पाहणी केली. या पाहणी दौर्‍यात पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग ‘अ’चे सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक नरेश ठाकूर, रामजी बेरा, आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, संजना कदम, समीर कदम, अमर उपाध्याय, कीर्ती नवघरे आदींसह पदाधिकारी व  कार्यकर्ते, तसेच सिडकोचे अधिकारी संजय पुदाले, एन. बैले, एस. देवरे सहभागी झाले होते.

या वेळी नागरी समस्या, नियोजित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकार्‍यांना निर्देश दिले. सिडकोचे अधिकारी संजय पुदाले यांनी सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply