Breaking News

सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्ष होतोय सज्ज

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळ मजल्यावर असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष 1 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळी कालावधीमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही 24 ु 7 (24 तास) तत्त्वावर कार्यरत  असणार आहे.

या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग आदी महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी 24 तास संपर्कात असतील. या कक्षाद्वारे वृक्षांची पडझड/वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या वृक्षांची छाटणी, रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे पूर्ववत बसवणे, पूर/पूरसदृश परिस्थिती, रस्त्यांवरील खड्डे, रस्ते वा नाल्याजवळ साचलेला कचरा, व्यक्तींचे पाणीसाठ्याच्या ठिकाणी बुडणे, आग व आगीचे विविध प्रकार, साथीचे रोग, विषारी प्राणी चावण्यासंबंधी बाबी, इमारत कोसळणे, भूस्खलन, पाणी साचणे या आपत्तींची दखल घेण्यात येऊन त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल. 

नागरिकांनी वरीलपैकी कोणतीही आपत्ती उद्भवल्यास पुढे देण्यात आलेल्या दूरध्वनी अथवा व्हॉटसप क्रमांकावर किंवा ई-मेलद्वारे सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आपत्तीसंबंधी माहिती द्यावी किंवा त्याबाबतची तक्रार नोंदवावी. दूरध्वनी क्र. 022-6791 8383/8384/8385, 27562999, टोल फ्री क्र. 1800226791, व्हॉटसअ‍ॅप क्र. 8879450450, फॅक्स क्र. 002-67918199, ई-मेल                शेललळवलेळपवळर.लेा

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply