पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी इंटर कॉलेज सायन्स फेस्ट स्पर्धेत मॉडल मेकिंग स्पर्धेमध्ये सुयश संपादित केले. के. एल. ई. कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स विद्यालयात या स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सुयश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 4) अभिनंदन केले.
के. एल. ई. कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या इंटर कॉलेज सायन्स फेस्ट स्पर्धेत मॉडल मेकिंग स्पर्धेमध्ये सीकेटी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत 24 कॉलेजनी सहभाग घेतला असून, सीकेटी विद्यालयातील महेंद्र उनडकट, शलाका सोनावणे, शिवानी गुंडाळे या विद्यार्थ्यांनी विद्यालयाला नावलौकिक मिळवून देण्याचे काम केले. या विद्यार्थ्यांचा संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव सिद्धेश्वर गडदे, इंदुमती घरत यांच्यासह मान्यवरांनी सत्कार केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper