
पनवेल : रामप्रहर वृत्त
एनआयईतर्फे घेण्यात आलेल्या सुपर लीग या स्पर्धेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाच्या विद्याथ्यार्र्ंनी सुयश संपादित केले आहे. इयत्ता चौथी ते नववीच्या प्रत्येक इयत्तेत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन तसेच दोन विद्यार्थ्यांना टॅब देऊन शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले.


विजेत्या विद्यार्थ्यांची मनस्वी, प्रतीक गंगाराम सावंत, तनिष्क राणे, प्रारंभी ॠषिकांत पवार, ओम विठ्ठल गागरे, अनुराग संतोष आमले, अशी आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper