पनवेल : वार्ताहर
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी (दि. 8) मोठ्या उत्साहात झाला. या वेळी माय मराठी या शीर्षकातंर्गत महाराष्ट्रातील विविध लोककला, तसेच पारंपारिक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केली.
संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. एस. वाय. ससाणे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, वकील संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक अरुणकुमार भगत, नगरसेविका सुशिला घरत, तसेच मंगेश वाकडीकर, एन. आर. पाटील आणि सीकेटी संकुलातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी पाल्यांना मातृभाषेतून का शिक्षण द्यावे व त्याचे फायदे काय असतात हे उपस्थित पालकांना सांगितले. अरुणशेठ भगत यांनी अध्यक्षीय भाषणात कोणत्याही क्षेत्रात मेहनतीशिवाय पर्याय नसल्याचे अधोरेखित केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी केले.
या कार्यक्रमात पूर्व प्राथमिक, प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पंढरीनाथ जाधव यांनी सूत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी सर्वच शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Check Also
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper