Breaking News

‘सीकेटी’त संविधान आणि हुतात्मा दिन कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (स्वायत्त) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत  आभासी माध्यमाद्वारे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे यांनी भारतीय राज्यघटनेचे महत्व यासंबंधी जनजागृती करावी असा सल्ला दिला. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मा. अल्लाउद्दीन शेख, सचिव, राष्ट्रीय सेवा दल यांनी सर्व उपस्थितांना भारतीय राज्यघटना व तिचे महत्व सांगितले आणि विशेष करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी 353 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी केले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, प्रा. पी. पी. मोकल, समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना रायगड, भूगोल विभागाचे प्राध्यापक डॉ. आर. ओ. परमार तसेच इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सत्यजित कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply