Breaking News

‘सीकेटी’मध्ये स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची पुण्यतिथी

पनवेल : रामप्रहर वृत्त

कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या नावाने व आशीवार्दाने सुरू करण्यात आलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदाकॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय आणि नवीन पनवेल येथील सीकेटी कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 7) अभिवादन करण्यात आले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो, पण सलग दुसर्‍यावर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन सीकेटी विद्यालयात नियमांचे पालन करून संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, मुख्याध्यापिका इंदुमती घरत यांनी अभिवादन केले. याचबरोबर सीकेटी महाविद्यालयात प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे यांनी स्व. जनार्दन भगत यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, डॉ. यु. टी. भंडारे व डॉ. शैलेश वाजेकर यांच्या उपस्थित होते. त्यांनीही अभिवादन केले.

एमएनएम विद्यालयातही अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालय व तुकाराम नारायण घरत (टीएनजी) कनिष्ठ महाविद्यालयात स्व. जनार्दन भगत यांचा पुण्यतिथी कार्यक्रम झाला. कोरोना साथरोगाचे गांभीर्य लक्षात घेत साध्या पद्धतीने आणि नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला. या वेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, प्रभारी मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक आदींनी भगत साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply