Breaking News

‘सीकेटी’ एनएसएसच्या स्वयंसेवकांचा अमलीपदार्थ विरोधी कार्यशाळेत सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन  भगत  शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीस स्वयंसेवकांनी पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नवीन पनवेल येथे नवी मुंबई कॉलेज असोसिएशन, आशा की किरण फाऊंडेशन तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अंमलीपदार्थ विरोधी कार्यशाळेत सक्रीय सहभाग नोंदवला.

या कार्यशाळेत अजय कदम, सहाय्यक पोलीस गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई यांनी उपस्थित स्वयंसेवकांना जीवनात व्यसनामुळे होणारे तोटे व त्याचा तरुणांवर होणार परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच तरुणांना आरोग्याची काळजी घेऊन अमलीपदार्थाच्या गर्तेत न अडकण्याचा सल्ला दिला. आशा की किरण  फाऊंडेशनचे श्री. कुरेशी यांनी स्वतःचे अनुभव कथन करून स्वयंसेवकांना अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. कार्यशाळेत अंमलीपदार्थ विरोधात एक लघुपट दाखवण्यात आला. कार्यशाळेत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे स्वयंसेवकांसोबत उपस्थित होते. या कार्यशाळेत सहभागी झालेबद्दल चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले. या वेळी विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचे सेवन करणार नाही, अशी ग्वाही मान्यवरांना दिली.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply