पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त) प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बुधवारी (दि. 13) सकाळी 11.30 वाजता संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे वित्त आणि लेखाधिकारी सीए डॉ. प्रदीप कामठेकर, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित राहणार आहेत.
याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, उपमहापौर सीताताई पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व नगरसेवक अनिल भगत, संजय भगत, नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, नगरसेविका हेमलता म्हात्रे, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.
या सोहळ्यात सर्व पालक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी केले आहे. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्टुडण्ट कौन्सिल व स्टुडण्ट वेलफेअर विभागाच्या चेअरमन डॉ. एम. ए. म्हात्रे, आयक्यूएसी विभागाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव व महिला विकास कक्षाच्या चेअरमन डॉ. आर. डी. म्हात्रे यांचा विशेष सहभाग लाभत आहे.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper