
पनवेल ः प्रतिनिधी : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शुक्रवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. एन. सी. सी. विभागातर्फे महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कला शाखेचे प्रमुख व एन. सी. सी. विभागाचे प्रमुख डॉ. यू. टी. भंडारे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचे एन. सी. सी. कॅडेट्स़, एन. एस. एस. विभागाचे विद्यार्थी़, सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर सेवकवर्ग अशा सुमारे 350 जणांनी सहभाग घेतला होता.आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी उपस्थितांकडून योगाभ्यास करून घेतला. योगाचे महत्त्व व योग करताना कोणती सावधगिरी बाळगावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपला आहार कसा असावा याबद्दलही सांगण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कला शाखेचे प्रमुख व एन. सी. सी. विभागाचे प्रमुख डॉ. यू. टी. भंडारे व विद्यार्थिनी सेनेच्या प्रमुख प्रा. एन. डी. तिदार यांनी विशेष परिश्रम घेतले.
RamPrahar – The Panvel Daily Paper