आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
पनवेल ः रामप्रहर वृत्त
मोरया सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित कलाकार क्रिकेट लीग 2025चे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात करण्यात आले. सुकापूर येथील स्कोरर टर्फ मैदानावर झालेल्या या स्पर्धेला परिसरातील कलाकार आणि क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला शनिवारी (दि. 11) पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष भेट देऊन खेळाडू आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी आयोजक गणेश सरवणकर, भाजप युवा मोर्चा पनवेल शहर मंडळ सरचिटणीस अक्षय सिंह, युवा कार्यकर्ते निलेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
कलाकारांच्या सहभागामुळे या लीग स्पर्धेने सामाजिक बांधिलकीसोबतच क्रीडांगणावर एकतेचा आणि उत्साहाचा संदेश दिला. आयोजकांनी सांगितले की, या स्पर्धेचा उद्देश कलाकारांना एकत्र आणत त्यांच्यातील खेळाडूवृत्तीला प्रोत्साहन देणे हा आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper