पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांची यांची माहिती
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पाली पोलीस स्थानकात नुकतीच पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांची बैठक संपन्न झाली. यावेळी विविध विषय व समस्यांवर चर्चा करण्यात आली. सुधागड तालुक्यातील मटका व्यवसाय व अवैद्य धंदे सर्वप्रथम बंद केले आहेत. तसेच गावठी दारू निर्मिती व विक्रीवर देखील टाच आणली असल्याची माहिती काईंगडे यांनी यावेळी दिली.
पालीतील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी हटाळेश्वर देवळाजवळ पार्किंग करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्यात यावे असेही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांवर कारवाई केली जाईल असे काईंगडे यांनी सांगितले. त्यानुसार शनिवारी (दि.30) बेकायदेशीरित्या पार्क केलेल्या मोटारसायकल चालकांवर कारवाई देखील करण्यात आली. पाली अंबा नदीवरील पुलाचा प्रश्न सोडवला आहे. संबंधित शेतकरी व एमएसआरडीसी प्रशासन यांच्यात समेट घडवून आणली आहे. त्यामुळे पुलातील अडथळा दूर होऊन पुलाचे रखडलेले काम आता सुरू झाले असल्याचे पोलीस निरीक्षक काईंगडे यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
जनतेचे देखील चांगले सहकार्य मिळत असल्याचे देखील काईंगडे या वेळी म्हणाले. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन उपाय सुचविण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper