Breaking News

सुधागड पालीत स्त्रीमुक्ती दिन साजरा; भीमयान दिनदर्शिकेचे झाले प्रकाशन

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुका बौद्धजन पंचायततर्फे पालीतील बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात नुकताच मनुस्मृती दहन व स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. सुप्रीम कमिटीचे अध्यक्ष मंगेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या अनघा भातणकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी संस्थेच्या वतीने भीमयान दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. महिला कमिटी अध्यक्ष रोहिणी जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मध्यवर्ती कमिटी सरचिटणीस नरेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. मध्यवर्ती कमिटी अध्यक्ष दीपक पवार, हभप महेश पोंगडे महाराज, गौतम गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, राजेश गायकवाड, विजय मोहिते, राजेश जाधव, अशोक वाघमारे, दिलीप जाधव, पिठु वाणी, सखाराम गायकवाड, नूतन शिंदे, मयूर मोरे, मोरेश्वर कांबळे, संतोष जाधव, अर्चना गायकवाड, मनीषा कांबळे, संजीवनी जाधव, अस्मिता कांबळे, विलास जगताप, राजेश गायकवाड या कार्यक्रमास उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply