पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पारदर्शकच असल्याचा दावा रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने केला आहे.
रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळास सुरक्षा रक्षकांची प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी मंडळाने मा. उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार शासनाने नियुक्त केलेल्या मे. सेराईज टेक सोल्युशन्स प्रा. लि. या संस्थेमार्फत ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी ऑनलाइन व स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करुन मार्च 2019 मध्ये सुरक्षा रक्षकांची नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे, हीऑनलाइन प्रक्रिया प्रथमच करण्यात आलेली आहे. जाहिरातीमध्ये नमुद केल्यानुसार सर्व उमेदवारांनी ुुु.ीसलीशसळीीींरींळेप.ळप या संकेतस्थळावर अर्ज सादर केले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper