पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पनवेल शाखेचे सुरक्षा रक्षक विवेक विठ्ठल पाटील यांच्या जागृकेबद्दल व प्रामाणिकपणाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला.
विवेक विठ्ठल पाटील यांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 22000 रुपये व काही कागदपत्रे असलेली पिशवी त्यांच्या निदर्शनास आल्यावर कार्यालयाच्या अधिकार्यांचा स्वाधीन केली. तसेच पिशवीतील कागदपत्रांच्या आधारे संबंधित व्यक्ती शोधून पडताळून सुभाष बाबर या संबंधित व्यक्तीला त्याची 22000 रोख रक्कम तसेच कागदपत्रे भारतीय आयुर्विमा मंडळाचे अधिकारी एडीएम देशपांडे, पी. एस. हेड, गणेश मुळीक आणि विकास अधिकारी गणेश घोणे या अधिकार्यांना समक्ष बाबर यांना सोपविली.
विवेक पाटील हे कार्यालयातील काम संपले की, रिक्षा व्यवसाय करतात. व्यवसायात त्यांना 4 फेब्रुवारीला त्यांच्या रिक्षेत एक प्रवासी भ्रमणध्वनी विसरले होते. या वेळी पाटील यांनी प्रामाणिकपणाने भ्रमणध्वनी प्रवाशाला स्वाधीन केला. पाटील हे सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालक म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणूनदेखील आदर्शव्यक्ती आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper