Breaking News

सैन्य दलातील सेवानिवृत्त कमांडो जयेश सुर्वेंचे माणगावात जंगी स्वागत

माणगाव : प्रतिनिधी

नगरपंचायत हद्दीतील वाकडाई नगरचे सुपुत्र कमांडो जयेश जयसिंग सुर्वे हे भारतीय सैन्य दलातून 17 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांचे शनिवार (दि. 2) माणगाव नगरीत वाजत गाजत जोरदार स्वागत करण्यात आले. कमांडो सुर्वे यांचे स्वागत करण्यासाठी माणगावमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माणगावमधील वीर यशवंतराव घाडगे माजी सैनिक संघटना, युवा निलेश थोरे मित्र मंडळ, युवा क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी कमांडो जयेश जयसिंग सुर्वे यांचा स्वागत सोहळा व मिरवणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी माणगाव बस स्थानकापासून कचेरी रोड, वीर यशवंतराव घाडगे स्मारक मार्गे वाकडाई नगरापर्यंत कमांडो जयेश सुर्वे यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

दरम्यान, कमांडो सुर्वे यांनी वीर यशवंतराव घाडगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वाकडाई नगर येथे जयेश सुर्वे यांचे ग्रामस्थांनीही जोरदार स्वागत केले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply