सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव

पनवेल ः रामप्रहर वृत्त
इतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक महिलांनी विविध क्षेत्रामध्ये आपले नाव कोरले आहे. स्त्रिया फक्त घर सांभाळणार्‍या किंवा समाजातील पारंपरिक भूमिका निभावणार्‍या व्यक्ती नाहीत, तर त्या समाजाची प्रगती आणि विकासाच्या मुख्य आधारस्तंभ आहेत. यामध्ये आदरणीय सौ. शंकुतला रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. या अनुषंगाने त्यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्काराने मंगळवारी (दि. 11) गौरविण्यात आले.
काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मातोश्री दिवंगत यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त यमुना सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने पनवेल तालुक्यातील शेलघर येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी सौ. शंकुतला ठाकूर यांना सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सन्मान सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, शिवसेना ‘उबाठा’चे संपर्क प्रमुख बबन पाटील, शिक्षक नेते दा.चां. कडू, संस्थेचे संस्थापक महेंद्र घरत, सचिव शुभांगी घरत, राम म्हात्रे, रघुनाथ घरत, राजेंद्र पडते, डॉ. मनीष पाटील, मिलिंद पाडगावकर, कामगार नेते वैभव पाटील, किरीट पाटील आदी उपस्थित होते.
थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव मदत करून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचा हातभार लावला आहे. आजपर्यंत 100 कोटींहून अधिक रुपयांची देणगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेला दिली आहे. कर्मवीर अण्णांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचा शैक्षणिक वारसा जपण्याचे कार्य लोकनेते रामशेठ ठाकूर अखंडपणे करीत आहेत. थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची कन्या आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनीही रयत शिक्षण संस्थेला कोट्यवधी रुपयांची देणगी दिली आहे. शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत. सामाजिक भावनेतून कार्य करताना ते आज समाजाचे आधारस्तंभ बनले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या अर्धांगिनी सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांनीही सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विधायक कार्यात सौ. शकुंतला ठाकूर यांचा मोलाचा वाटा आहे. याबद्दल त्यांचा यमुना शैक्षणिक सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
यमुना स्त्री सन्मान पुरस्काराने यांचा झाला सन्मान
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर (सामाजिक व शैक्षणिक), सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (कला), प्रमदा बिडवे (प्रशासन), डॉ. शीतल जोशी, डॉ. समिधा गांधी, डॉ. कीर्ती समुद्र, डॉ. प्रकाश निघूकर व डॉ. जिज्ञासा विजय कडू (वैद्यकीय), सुरेखा म्हात्रे (शैक्षणिक), अनुराधा उरसल, रिया पाटील व प्राची ठाकूर (कला).

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply