पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नॅपशॉटस् फोटोग्राफी कॉम्पिटिशन 2021 स्पर्धेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. तब्बल 1113 स्पर्धकांनी सहभाग घेऊन या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी विजेत्यांचे स्पर्धकांचे अभिनंदन केले असून, सहभागी सर्वांचे आभार मानले आहेत.
असा आहे निकाल विषय– निसर्ग-कॅमेरा फोटोग्राफी ः अनुज मोजाड प्रथम, ऐश्वर्या नटराजन व अश्ना धिमान द्वितीय, अनुष्का डी. सी. तृतीय. मोबाइल फोटोग्राफी ः महिंदर शर्मा प्रथम, ऋषिकेश पातुरकर व सानिका पवार द्वितीय, आदित्य अवघडे व शुभम सुंके तृतीय; विषय वन्यजीव-कॅमेरा फोटोग्राफी ः ओमकार मनोहर कोंडेकर प्रथम, क्षितिज कैलास खंदारे व लाझारुस पॉल द्वितीय, प्रदीप चौधरी तृतीय. मोबाइल फोटोग्राफी ः प्रतिक कदम प्रथम, राशिद अफसार द्वितीय, संदेश बाळाराम म्हात्रे तृतीय; विषय प्रगतिशील महिला ः स्वप्नील रघुनाथ साखरे प्रथम, राहुल प्रेमकुमार द्वितीय, प्रवीण मारुती शिंत्रे तृतीय; विषय पाणी वाचवा-कॅमेरा फोटोग्राफी ः लक्ष्मण ठाकूर प्रथम. मोबाइल फोटोग्राफी ः भक्ती महेश देशमुख प्रथम.
RamPrahar – The Panvel Daily Paper