नगरसेविका कुसूम पाटील यांचा पुढाकार

कळंबोली ः रामप्रहर वृत्त
खांदा कॉलनी येथे सीकेटी महाविद्यालयाकडे जाणार्या रेल्वे उड्डाणपुलाखाली पावसाळ्यात नेहमी पाणी साचते. आता पनवेलमध्ये पाच दिवस सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या पुलाखाली पाणी साचले आहे. यावर उपाययोजना करताना नगरसेविका कुसूम पाटील यांनी स्वखर्चाने यंत्रणा लावून गटारे, नालेसाफाई करून साचलेल्या पाण्याला वाट करून दिल्याने त्यांचे परिसरातून व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन केले जात आहे.
खांदा कॉलनी व सीकेटी महाविद्यालयाकडे पनवेलमधून जाणारा (अमरधाम स्मशानभूमी) रस्ता रेल्वेलाईन क्रसिंगवर रस्त्यापासून खाली आहे. त्यात सिडकोने नालेसफाई केली नसल्याने या रस्त्यावर पाणी साचते. त्या पाण्याचा निचारा लवकरात लवकर कसा होईल, अशी व्यवस्था करायला पाहिजे. याबाबतच्या सूचना नगरसेविका कुसुम पाटील यांनी वेळोवेळी सिडकोशी पत्रव्यवहार करून केल्या होत्या, परंतु सिडको प्रशासनाकडून काम न झाल्याने कुसुमताईंनी स्वखर्चाने हे काम केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper