पनवेल ः वार्ताहर
नवीन पनवेल येथील मेनन जिमचा शरीरसौष्ठवपटू स्वप्नील सोनावणे याची डायमंड श्री या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी इंडियन फेडरेशन बॉडी बिल्डिंग संघातून 60 किलो वजन गटात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा औरंगाबाद येथे 16 व 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
या स्पर्धेकरिता आशिया खंडातील जवळपास सर्व देशांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. निवडीबद्दल शरीरसौष्ठवपटू स्वप्नील सोनावणे याचे मेनन जिम नवीन पनवेल, खांदा कॉलनीचे संचालक संजीव मेनन व टीमने अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्वप्नीलने यापूर्वी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper