पनवेलमध्ये लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचा उपक्रम
पनवेल ः बातमीदार
लक्ष्मी आय इन्स्टिट्युट व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे 15 ऑगस्टच्या दिवशी 72 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात येणार आहे. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट संचालक डॉ. सुहास हळदीपूरकर व त्यांच्या टीमने यासाठी पुढाकार घेतला असून ठाणे व रायगड येथील ग्रामीण भागातून रुग्ण लक्ष्मी आय इन्स्टिट्युटमध्ये दाखल होणार आहेत. याविषयी अधिक माहिती देताना लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सुहास हळदीपूरकर सांगतात, 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे व या दिवशी आमची सर्व टीम अकाली येणार्या अंधत्त्वावर मात करण्यासाठी मिशन दृष्टी ही संकल्पना राबविणार आहोत.
RamPrahar – The Panvel Daily Paper