Breaking News

स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग प्रेरणादायी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आम्हाला कायमच प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमधील हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यावेळी केले.
या सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिकांचे उत्तराधिकारी श्रीमती ताराबाई बबन धरणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी आमदार विक्रांत पाटील, आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार विजय पाटील, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, तेजस कांडपिले, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, युवा नेते प्रतीक बहिरा आदी उपस्थित होते.
तसेच यावेळी उपायुक्त सर्वश्री डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, मंगला माळवे, स्वरूप खारगे, सहायक, सुबोध ठाणेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी व स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply