पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील हमरापूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आदित्य इलेव्हन दादर संघाने विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघास आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते एक लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
स्पर्धेत 17 संघ सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण समारंभास भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, रायगड प्रीमियर लीग अध्यक्ष मंगेश वाकडीकर तसेच हमरापूर विभाग सरपंच, उपसरपंचांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून भव्य अशा मैदानासाठी एक कोटी 20 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुले क्रिकेटसोबत कबड्डी, हॉकी अशा विविध खेळांमधून कौशल्य दाखवून रायगडसह महाराष्ट्राचे व भारत देशाचे नाव उंचावतील, असा विश्वास या वेळी त्यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
द्वितीय क्रमांक प्राप्त गिअर ऑटोमोबाईल्स तांबडशेत या संघास 50 हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांक सिद्धी श्रवण वॉरियर्स खारसापोली संघाला व चतुर्थ क्रमांक मिळविणार्या रावे इंडियन्स संघास प्रत्येकी 25 हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. याशिवाय मालिकावीर समीर पाटील, उत्कृष्ट फलंदाज सुशांत शेदवळ, उत्कृष्ट गोलंदाज राम म्हात्रे यांनाही बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper