वाहतूक पोलीस रमेश गायकवाड यांचे विशेष कौतुक
पेण : प्रतिनिधी
खेड ते ठाणे असा प्रवास करणार्या दुचाकीस्वाराची सोन्याच्या दागिन्यांची बॅग रविवारी (दि. 24) पेण वाहतूक पोलिसांना मिळून आली. पेण पोलीस ठाण्यात दागिन्यांची व संबंधितांची खातरजमा करून ती बॅग मुळ मालकाच्या ताब्यात देण्यात आलीे. त्यामुळे पेण पोलिसांचे तसेच वाहतूक पोलीस रमेश गायकवाड यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.प्रभू रामचंद्र शिंदे (वय 40, रा. ठाणे, मूळ रा. खेड, जि. रत्नागिरी) हे पत्नी छायासह रविवारी दुचाकी (एम्एच-04,जेइ-2794) वरून खेड येथून ठाण्याला जात होते. त्यांच्या दुचाकीला बांधलेल्या दोन बॅगांपैकी सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रवासादरम्यान हरवली असल्याचे साई-पनवेल येथे आल्यावर त्यांच्या लक्षात आले. याच मार्गावर बॅग शोधत असताना बॅग वाहतूक पोलीस रमेश गायकवड यांना मिळाली असल्याचे समजले.वाहतूक पोलीस रमेश गायकवड यांना सापडलेल्या बॅगेतील मंगळसूत्र, सोन्याचे कानातले दोन जोड, सोन्याचा एक हार, सोन्याची अंगठी, सोन्याची माळ, सोन्याच्या कानातील बुगडी जोड़ एक, चांदिचा छल्ला असे दागिने प्रभू शिंदे यांचेच असल्याची खातरजमा पेण पोलीस ठाण्यात करून ही बॅग त्यांच्या ताब्यात देण्यात आली.
RamPrahar – The Panvel Daily Paper