
उरण : रामप्रहर वृत्त
धुतुम येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या ठेकेदारातर्फे काम करणार्या कामगारांना सोमवारी (दि. 16) डेपोटी लेबर कमिशनर संभाजी व्हनालाकर यांच्या वतीने कामगार उप आयुक्त कार्यालयात पगारवाढ करण्यात आली. या वेळी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, संघटक रवींद्र कोरडे, धुतुम येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या कंपनी व्यवस्थापनाचे डेपोटी मॅनेजर माने, तसेच संतोष तांडेल, कॉन्ट्रॅकटर हायवे रोडलाईन्स प्रा. लि. चे मालक प्रतिनिधी व्यवस्थापक प्रमोद श्राफ, व्यवस्थापक वसंत डोंगरे, कामगार प्रतिनिधी मंगेश केदारी, वैभव पाटील, राजेश शेळके, दीपक गावंड, मुकेश भोईर, ओमकार घरत, सुहास पाटील, शेखर म्हात्रे असे युनियन प्रतिनिधी, कंपनी व्यवस्थापन, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper