Breaking News

हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी आरोपी दोषी; गुरुवारी निकाल

वर्धा : प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार्‍या हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे. कोर्ट गुरुवारी (दि. 10) आरोपीला शिक्षा सुनावणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून 3 फेब्रुवारी 2020 रोजी शिक्षिकेला पेटवले होते. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत होती. पोलिसांकडून या प्रकरणी 426 पानांचे दोषारोपपत्र, 64 सुनावण्या आणि 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पीडित तरुणीच्या मृत्यूला दोन वर्ष पूर्ण होत असून तिच्या स्मृतिदिनीच कोर्ट शिक्षेची सुनावणी करणार आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply