रांची : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तुमच्यात हिंमत असेल तर पाकिस्तानमधील प्रत्येक नागरिकाला भारतीय नागरिकत्व देण्याची घोषणा करावी, असे मी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना आव्हान देतो. देश त्यांचा हिशेब चुकता करेल. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पुन्हा कलम 370 लागू करून दाखवा. तिहेरी तलाकविरोधी जो कायदा केला आहे तो रद्द करा, असेही मी आव्हान देत असल्याचे मोदी म्हणाले. झारखंडच्या बरहेटमधील निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेस आणि त्यांचे काही सहकारी पक्ष या मुद्द्यावर मुस्लिमांना चिथावणी आणि भीती दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपली राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण देशातील एकाही नागरिकावर या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper