Breaking News

हुतात्मा स्मारक परिसराच्या सुशोभीकरणास सुरुवात

कर्जत : बातमीदार

हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या मानिवली या गावात   शासनाने बांधलेल्या हुतात्मा स्मारकाचा कायापालट करण्याचे काम सुरु आहे. मानिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्मारक परिसराचे सुशोभीकरण केले जात असून नियोजित कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे येत्या 2 जानेवारी रोजी लोकार्पण केले जाणार आहे.

क्रांतिकारक गोमाजी पाटील यांचे सुपुत्र हिराजी हे मानवली गावी राहत होते, मात्र पित्याला शोधण्यात अपयश आल्याने त्यांचे पुत्र हिराजी यांना ब्रिटिशांनी पकडून नेले. पुढे भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील यांच्या लढ्यात सामील झालेले हिराजी यांना 2 जानेवारी 1943 मध्ये वीरमरण आलेे. राज्य शासनाने मानिवली येथे सुमारे पाच एकर जागेत हिराजी गोमाजी पाटील यांचे स्मारक उभारले आहे. त्यात सभागृह, बालकांसाठी अंगणवाडी, खुले रंगमंच यांची निर्मिती करण्यात आली आहे.आपल्या गावातील सुपुत्राचे हुतात्मा स्मारक अधिक देखणे आणि आकर्षक असावे, यासाठी मानिवली ग्रुप ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. सरपंच प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून स्मारक परिसरात बदल केले जात आहेत. हुतात्मा स्मारक परिसरातील क्रांतिकारक गोमाजी पाटील सामाजिक सभागृहाचा कायापालट केला जात आहे. त्यात व्यासपीठ उभारले जात असून सभागृहदेखील सुशोभित केले जात आहे. खुल्या रंगमंचाचेदेखील सुशोभीकरण केले जात आहे. परिसरात नियोजनबद्ध रीतीने झाडांची लागवड करण्यात आली असून, त्या झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी घातले जात आहे. ठिकठिकाणी बाकडी बसविले जात आहेत. प्रवेशद्वाराच्या बाजूला प्रशस्त गार्डन विकसित केले जात आहे. पेव्हर ब्लॉक लावून वाहनतळ बनविले जात आहे. ही सर्व कामे हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनी म्हणजे 2 जानेवारी 2020 रोजी साजर्‍या होणार्‍या कार्यक्रमापूर्वी पूर्ण केली जातील, अशी माहिती प्रवीण पाटील यांनी दिली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply