पनवेल : रामप्रहर वृत्त
होपमिरर फाऊंडेशनने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत तळोजा एमआयडीसी येथील परमशांती वृद्धाश्रम यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यामध्ये टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, वॉशिंग पावडर इत्यादी वस्तू देण्यात आल्या.
संस्थेचे संस्थापक रमजान शेख यांनी त्यांच्या टीम सदस्यांसह आश्रमातील वृद्धांना आवश्यक किट्सचे योग्य वाटप केले. ते म्हणाले की, आम्हाला परमशांती वृद्धाश्रम आणि त्यांच्या आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल माहिती मिळाली. आम्ही निर्णय घेतला वृद्धाश्रमात भेट दिली आणि आवश्यक वस्तूंचे वाटप केले.
दुर्दैवाने कोविडमुळे आम्ही वृद्धापैकी केवळ काहीजणांनाच भेटू शकलो. इथे आल्यामुळे सर्व वृद्ध व्यक्तींकडून आम्हाला आशीर्वाद मिळाला. आम्हाला या आश्रमाला पुन्हा भेट द्यायला आवडेल. पुढील काळात आमच्या संस्थेकडून नक्कीच मदत करू.
होपमिरर फाउंडेशन ही एक संस्था आहे जी मानवतेच्या उन्नतीसाठी सामाजिक कल्याणाच्या दिशेने कार्य करते. कोरोना काळामध्ये या संस्थेकडून अनेक गरजू नागरिकांना मदत करण्यात आली.
परमशांती वृधाश्रमाचे संस्थापक स्वामी अबानंदगिरी महाराज म्हणाले की, येथे कोणतेही देणगीदार येत नसल्यामुळे आम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. टीम होप मिररने वृद्धांना मदत करण्यासाठी पुढे आले. आमची संस्था होप मिरर फाऊंडेशनची खूप आभारी आहे. भविष्यातही त्यांचे प्रेम व समर्थन मिळावे अशी आमची इच्छा आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper