पनवेल : वार्ताहर
पनवेलमधील डॉ. प्रज्ञा भोईर यांनी पंचक्रोशीत आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप केले. त्याचा अनेकांनी लाभ घेतला.
आयुष मंत्रालयाच्या शिफारशीनुसार आर्सेनिक अल्बम-30 या होमीओपॅथीक गोळ्यांचा डोस रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम डॉ. प्रज्ञा भोईर यांच्या वतीने संपूर्ण बोर्ली पंचक्रोशीत राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाची सुरुवात बँक ऑफ इंडिया, बोर्ली शाखा व्यवस्थापक यांच्याकडे औषधे सुपूर्द करण्यात आली. तसेच ज्यांना हे औषध हवे असेल त्यांनी
डॉ. प्रज्ञा भोईर (8692999090) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper