
पनवेल ः महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून मनपा क्षेत्रात असलेल्या विविध समस्यांची पाहणी करून नागरिकांना सुविधा देण्याचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 19मधील राजीव गांधी गार्डनच्या बाजूने वाहणार्या गाढी नदीपात्राची साफसफाई करण्यासंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी अधिकार्यांसह पाहणी केली व आवश्यक त्या सूचना केल्या. या वेळी नगरसेवक अजय बहिरा, उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय कटेकर, शैलेश गायकवाड आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper