
गव्हाण : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंत्ती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त गव्हाण ग्रा.पं.तीच्या कार्यालयात जयंत्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी भेट देत डॉ.बाबासोहब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी गव्हाण ग्रा.पं.च्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, ग्रा.पं.सदस्या कामिनी कोळी, सदस्य अरुण कोळी, मनीषा घरत, कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ कोळी, जयवंत देशमुख, माजी सदस्या जयश्री देशमुख, दामोदर भोईर, कैलास देशमुख, ग्रामसेवक एम. डी . पाटील आदि उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper