पनवेल ः भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर सरचिटणीस सपना पाटील यांना वाढदिवसानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, सरचिटणीस लीना पाटील, श्वेता खैरे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.