
कामोठे : येथे 21 जुलैला दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघातामध्ये जीव गमवावा लागलेल्या वैभव गुरव आणि सार्थक चोपडे यांच्या कुटुंबीयांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचे धनादेश सोमवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिला. या वेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘क’चे अध्यक्ष गोपीनाथ भगत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका मोनिका महानवर, अरुणा भगत, भाजप नेते राजेश गायकर, के. के. म्हात्रे, भाऊ भगत, रवी जोशी, प्रदीप भगत, सचिन गायकवाड, काकासाहेब कुत्तरवडे, संदीप तुपे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper